Sunday, April 24, 2011

Dashamahavidya Bhuvaneshwari


श्री भुवनेश्वरी देवी 
देवी भागवतामध्ये वर्णन केलेल्या मणिद्वीपाची  अधिष्टात्रीदेवि 'ह्रींमंत्राची स्वरूपा शक्ती आणि सृष्टी क्रमात महालक्ष्मी स्वरूपा -आदिशक्ती भुवनेश्वरी ही शंकराची लीला सहचरी आहे .भक्तांना अभय  सर्व सिद्धी देणे हा हिचा स्वाभाविक गुण आहे .दश महाविद्यात हिचा क्रम पाचवा असून देवी पुराणाप्रमाने मूळप्रकृतीचे दुसरे नाव भुवनेश्वरी आहे.ईश्वर रात्री मध्ये जेव्हा ईश्वराच्या जगद्रूप व्यवहाराचा लोप होतो त्यावेळी केवलब्रह्म  आपल्या अव्यक्त प्रकृती सोबत शेष राहतो त्यावेळी ईश्वररात्रीची  अधिष्टात्री भुवनेश्वरीदेवी हीच असते. हिलाच वामा, ज्येष्ठा व रौद्री या नावाने ओळखले जाते. शंकराच्या डाव्या भागालाच भुवनेश्वरी म्हणतात. भुवनेश्वरीच्या साथी मुळेच भुवनेश्वर सदाशिवाला सर्वेश्वर होण्याची योग्यता प्राप्त होते, ती केवळ तिच्या मुळेच.

          महानिर्वाण तंत्राप्रमाणे संपूर्ण महाविद्या भुवनेश्वरीदेवीची सदैव सेवा करत असतातसात करोड महामंत्र हिचीच आराधना करतातदशमहाविद्या मध्ये काली पासून कमला पर्यंत दहा अवस्था आहेतज्यामध्ये अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांडाचे  स्वरूप धारण करते आणि प्रलय काला मध्ये कमलासे अर्थात व्यक्त जग क्रमशः नाश पावून पुन्हा मूळ प्रकृती बनते म्हणजेच काली रूप प्रगट होतेम्हणून भुवनेश्वरी देवीला काळाची जन्मदात्री असे हि म्हटले जाते.

         दुर्गासप्तशतीच्या ११व्या अध्यायाच्या मंगलाचरणामध्ये हिचे वर्णन आहेपुराणातील संदर्भाप्रमाणे काली आणि भुवनेशी दोन्ही एकच आहेतअव्यक्त प्रकृती भुवनेश्वरी हीच रक्तवर्णा कालीच आहेदुर्गम नावाच्या असुराच्या अत्याचाराने संतापलेल्या देव  ब्राह्मणांनी हिमालयात भुवनेश्वरी देवीचीच आराधना केली होतीत्यांच्या आराधनेला प्रसन्न होऊन देवी प्रगट झालीतिच्या डोळ्यातून सहर्त्रधारा प्रगट झल्या  भूमंडळ तृप्त झालेम्हणून भुवनेश्वरी देवी शताक्षी  शाकंभरी नावाने विख्यात झालीदुर्गमासुराला मारले म्हणून तिलाच दुर्गा असेहि म्हटले जातेभुवनेश्वरीची उपासना पुत्र प्राप्तीसाठी विशेष फलप्रद आहे.

No comments:

Post a Comment