भुवनेश्वरी तुज करीत आरती आनंद उर्मी मना
अंबिके वंदन तुजसी त्रिवार
चंडिके वंदन तुजसी त्रिवार ॥धृ ॥
प्राणज्योतीने ओवाळीयले माझा मी पण हरवूनी गेले
मंगल चांदी गात मुखाने त्रिवार जय जय कार
अंबिके वंदन तुजसी त्रिवार ।
धुंद जाहला दक्ष प्रजापती ओळख नाही त्याला तुझी ती
कटू वचनाने अपमानी तुज दावी त्यास प्रताप
अंबिके वंदन तुजसी त्रिवार ।
त्या दक्षाच्या यज्ञा माजी उडी टाकिसी तू क्रोधानी
रुद्र रूपाने वीरभद्र हा करितो हा संहार
अंबिके वंदन तुजसी त्रिवार ।
No comments:
Post a Comment