सिंहासनावरी सिद्धमूर्ती बाळा
अष्टभुजा अंबा सतरावी कळा
ध्यानासी आणिता तव म्यां देखियली डोळा
शिवबोधे निजतत्वे पंथ आगळा
जय देवी जय देवी वो त्रिपुरे ।
त्वरिता पुरस्वमिनी मातापूरस्वामिनी तुळजापुरस्वमिनी
जय देवी जय देवी वो त्रिपुरे ।
तू हा विश्वाधारे तोडी हा भवपाश भवकरुणाकरे
सोऽहं तत्वे निवटोनि तुझेची नि आधारे ॥
अष्टभुजा अंबा अष्ट आयुधे शोभती
शंख चक्र गदा तुझे हाती शक्ती
त्रिशूळ डमरू धरा जटा विभूती
तुझे म्यां देखियले नयनी
जाली ज्ञानाची स्फूर्ती ॥
सिद्धीबुद्धी मुक्ती ह्या तिन्ही ज्योती
सहज ब्रह्ममाया आरती ओवाळिती
तुझे चरण तीर्थे कोटीकुळे उद्धरिती
नित्य स्वरूप ध्याये दास सनती ॥
No comments:
Post a Comment